हे महामानवा घे तुझ्या या लेकरांची वंदना

 

हे महामानवा घे तुझ्या या लेकरांची वंदना


 फार दिवसांपुर्वीची गोष्ट आहे UPSC च्या पुर्व परिक्षेसाठी मुंबईला गेलो सोबत IAS ची तयारी करणारे अनेक मिञ मैत्रीणी सोबत होते आदल्या दिवशी पेपर संपवुन दुसऱ्या दिवशी मुंबई फिरण्याची योजना आखलेली होती म्हणून दादरला राजगृहावर जायचं ठरल होतं आणी दुसऱ्याच दिवशी आम्ही राजगृहावर पोहचलो होतो हातावर घडी, अर्धवट फाटलेली फंँशनची जिन्स आणी पांढरा शुभ्र शर्ट अंगावर डोळ्यांत शिक्षणाचा रुबाब राजगृहाच्या पायऱ्या भरभर चढत आत गेलो.
राजगृहाचा आतल्या भिंतीवर हात फिरवीत होतो या भिंती विटामातींच्या असतील माञ आज यांचे आभार मानावे तेवढे कमीच होते या भिंतीनी अशा वटवृक्षाला सावली दिली ज्या वटवृक्षाने अवघ्या बहुजनांना मायेची सावली दिली मि भिंतीवर हात फिरवित त्या भिंतीना धन्यवाद देत होतो आभार मानत होतो.
एक एक गोष्ट अनुभव करत होतो बाबांच्या आठवणींना मनात साठवण्याचा प्रयत्न करत होतो या क्रांतीसुर्याला मनात साठवणे शक्य नव्हते परंतु माझा केविलवाणा प्रयत्न करत होतो.
राजगृहाच्या ग्रंथालयात भला मोठा फोटो बाबासाहेब वाचनात मग्न असल्याचे वाटले समोर बाबांनी मिळवलेल्या पद्व्या (degree)चा भालामोठा बोर्ड समोर लावला होता एखाद्या ग्रंथाचा उतारा असावा असे वाटावे आणी ते हि तेव्हा जेव्हा शुद्रांनी शिक्षण घेणे शक्यच नव्हते तेव्हा एवढे शिक्षण म्हणजे मनुवाद्यांच्या नरडीचा घोटचं बाबांच्या पद्व्याचा एखादा पाढा वाचावा असा वाचत सुटलो आणी जसाजसा मि एक एक ओळ वाचतं होतो तसातसा माझ्या डोळ्यांतला शिक्षणाचा रुबाब गळुन पडला डोळे पाणावले होते अक्षरे अंधुक दिसु लागले माझ्यातला जिवं निघुन गेल्यासारखा मि समोरच्या खुर्चीच्या हातावर डोकं ठेऊन अश्रु नकळतपणे ओघळतं होते नकळत बाबांनी माझ्या डोक्यावर हात ठेऊन शांत केलं असावं असा नकळत भास झाला आणी मि बाबांच्या खुर्चीवर हात फिरवून बाबांचा स्पर्श जाणवु लागला डोळ्यांतल्या अश्रुंचा वेग वाढला होता आणी मनातला सारा गर्वच नष्ट झाला होता वटवृक्षाच्या पानाप्रमाणे साराच रुबाब गळुन पडला असावा याच प्रमाणे मि त्या खुर्चीच्या पायांजवळ नतमस्तक झालो आणी नकळत काहि ओळीचे गाणे ऐकु येऊ लागले.

 "मि भिमाला रमाला इथे पाहतो"
हे समाजा तुला मी फुले वाहतो

  आणी आज बाबांच्या सावलीतुन पोरक होऊ नये असचं वाटत होत माञ पुन्हा एकदा बाबांच्या सावलीला मुकलो आणी नकळत राजगृहाचा निरोप घेतला.
  ऐरवी मी कधीही कोणाला माझ्या शैक्षणिक पद्व्या सांगत नाही आज कोणी मला विचारलं या देशातली सर्वात सुंदर वास्तु कोणती तर मि ताजमहाल पेक्षा राजगृह उच्चारेल.
  अशा या महामानवाला आणी भारतातील जवळपास ऐंशी टक्के बहुजनांची सावली बोधिसत्व डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज दिनांक  ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी नतमस्तक होऊन वंदन करतो.
 आणी पंकज लिखीत दोन ओळी आठवत आहेत
मि वंदितो भिमाला
मि वंदितो रमाला
मि पुन्हा वंदितो त्या राजगृहाला
 

                                       -अँड. पंकज गायकवाड
                                   


               (सदरचा लेख काल्पनिक आहे.)






No comments

Powered by Blogger.