क्रांतिकारी विचारसरणीचे सच्चे राष्ट्रसंत रोहिदास महाराज

क्रांतिकारी विचारसरणीचे सच्चे राष्ट्रसंत रोहिदास महाराज









जात पात के फेर में उरझी रहे सब लोग 
मनुष्यता को खात रविदास जात का रोग


 14 व्या शतकात विषमतावादि व्यवस्थेविरुध्द बंड पुकारुन जाती प्रथेला सुरुंग लावणारे एक क्रांतिकारी विचारवादि संत रोहिदास  
संत रोहिदासांनी सामाजिक कार्याचा प्रचार व प्रसार संपूर्ण उत्तर आणि दक्षिण भारतात केला. त्यामुळे संत रोहिदास विविध प्रांतामध्ये विविध नावांनी ओळखले जातात. यामध्ये बंगलमध्ये रुईदास, रूयदास, राजस्थानमध्ये रोहिदास, मराठी प्रांतात रोहिदास, रोहितदास तर पंजाबमध्ये रैदास किंवा रेयीदास आणि हिंदी रविदास व अशी विविध नावे त्यांची प्रचलित आहेत. संत रोहिदासांना महाराष्ट्रात ‘रोहिदास’ म्हणतात संत रोहिदास भारतातील एकमेव असे संत आहेत की, त्यांना १६ नावांनी ओळखले जाते. प्रचंड प्रतिभा, प्रभावी वाणी, संघटन कौशल्य, सामान्य जनतेविषयी आस्था, श्रध्दा, प्रेम, करुणा बंधुत्व हेच अष्टपैलू त्यांच्या व्यक्तीमत्वाचे होते. 
 त्यांची स्मारके, पुतळे, त्यांच्या नावाच्या धर्मशाळा देशभर आहेत त्यांना पूर्ण देश ओळखतो. ख-या अर्थाने ते एकमेव राष्ट्रीय संत आहेत आणी शिखांच्या ‘गुरू ग्रंथसाहिब’ मध्ये संत रोहिदासांची ४० पदे आहेत. संत रविदास हे उपेक्षित समाजाचे संत असतानाही शिखांच्या धर्मग्रंथात त्यांच्या रचनांना मानाचे स्थान मिळाले हे संत रोहिदांच्या पुरोगामीत्वाची पोहच पावतीच आहे 
 संत रोहिदास महाराज हे भारतभर फिरले , त्यातून त्यांना देशातील जाती व्यवस्थेचे दाहक अनुभव आले आणि त्यामुळे ते समतेचे पुरस्कृते झाले जात पात, अंधश्रध्दां , दैववाद, विषमतावादी  व्यवस्थेविरुध्द बडखोरीही संत रोहिदासांच्या साहित्यातुन येते  व सर्व मानवप्राणी सामान आहेत. मनुष्य जातीने नाही तर आपल्या कर्माने मोठा अथवा लहान ठरतो असे वारंवार संत रोहिदास सांगत त्यामुळे डाँ बाबासाहेब आंबेडकर  समता , स्वतंत्र , बंधुत्व आणि न्याय याचा पुरस्कार करणारा द अनटचेबल ( The Untouchable ) नावाचा ग्रंथ संत रोहिदास महाराजानां समर्पित केला. हा संत रोहिदासांच्या कर्तुत्वाचा केलेला आदर आपल्याला दिसुन येतो . 
त्यांच्या अलौकिक विद्वातेने सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले त्यांचे शिष्य बनले . संत रोहिदासांचा प्रभाव संत कबीर यांच्या वरही पडतो कारण संत रोहिदास व संत कबिर हे दोघी स्वामी रामानंद यांचे शिष्य होते व संत कबीर फ़क्त संत रोहिदास आणि संत नामदेव यांनाचं संत पद बहाल करतात त्यामुळे पुरोगामी व क्रांतिकारक विचारसरणी असलेले संत रोहिदास यांच्या चरिञ्यात चमत्कारी गोष्टींचा समावेश करुन सनातनी लोकांनी  त्यांचे क्रांतिकारक आणि विषमतेच्या विरोधात असणारे विचार दडपुन टाकण्याचा प्रयत्न केला आणि ते त्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले . त्यामुळे क्रांतिकारी विचार असणारे त्यांचे शिष्य परम्परांच्या चाकोरीत गुरफुटेल गेले संत रोहिदास यांचे क्रान्तिकारकत्व हे देव देव्हार्यात बंदिस्त झाले आणि त्यांना मानणारा समाज दैववादी व्यवस्थेचा गुलाम झाला . संत कबीर , संत बसवेश्वर , संत रोहिदास , संत नामदेव , संत तुकाराम आणि यासारखया संतानी सर्व मनुष्य प्राण्यांला मानवतेच्या धाग्यात गुंफण्याचा प्रयत्न केला . मात्र येथील विषमतावादी व्यवस्थेने त्यांचे दैविकरण करुन त्यांच्या विचारसरणीला तिलांजली दिली नंतर त्यांच्या साहित्यात चमत्कारिक गोष्टीचा समावेश  केला व संत परंपरेच्या सार्या शिष्यांना भरकटवले व क्रांतिकारी चळवळीला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. माञ नेहमीच त्यांच्या पुरोगामी साहित्यातुन समता न्याय स्वातंत्र्य बंधुभाव व देशभक्तीचे धडे घेता येतील यात शंकाच नाही 

हिल मिल चलो जगतमे, फूट पडो दो नही
फूट पडी माची तो, देश नष्ट हो जाई


अशा या महान विभुतीस त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन 
                                    - पंकज गायकवाड 

No comments

Powered by Blogger.