महात्मा फुलेंचे ज्ञानी समाजाचे स्वप्न आणी वास्तव



महात्मा फुलेंचे ज्ञानी समाजाचे स्वप्न आणी वास्तव





 महात्मा जोतीबा फुलेंनी अवघ्या जिवनभर जातीव्यवस्थेविरुध्द लढा दिला माञ त्यामुळे आज जातीनिर्मुलन करुन महात्मा फूलेंना श्रध्दांजली वाहिली गेली पाहिजे होती माञ अनेक वर्षांनंतरही तसे होतांना आपल्याला दिसत नाही हिच भारतीय समाजव्यवस्थेची दुरावस्था आहे. महात्मा फुलेंसह संत कबिर, संत नामदेव , संत तुकाराम , छ. शिवाजी महाराज,  राजर्षी शाहु महाराज , डाँ. बाबासाहेब आंबेडकर , भावराव पाटिल, आण्णाभाऊ साठे,   नरेंद्र दाभोळकर, डाँ कलबुर्गी, गौरी लंकेश आदि अनेक महापुरुषांनी जाती व्यवस्थेला तिलांजली दिली आणी पुरोगामीत्वाची चळवळ जोमाने उभी केली माञ अशा अनेकाविध महापुरुषांच्या विचारांनी भारावुन जाऊन जातीविरहित समाज रचना करुनच या महामानवांना आदरांजली दिली जाईल माञ समाजातल्या अज्ञानी लोकांनी स्वार्थापोटि जातीरचनेची व्यवस्था टिकवुन ठेवली जाते आणी निवडणुकांमध्ये भांडवल बनवुन सत्तेच्या चाव्या हस्तगत केल्या जातात. पुन्हा गरिबदुबळ्या जातीव्यवस्येचा बळी ठरलेल्या जनतेला दारिद्रयात खितपत पडावं लागतं हे जळजळीतवास्तव या भारतीय समाजरचनेची शोकांतिका आहे म्हणून याच समाजाच्या उत्थानासाठी वयाच्या एकविसाव्या वर्षी अस्पृश्य व स्ञीसांठी शाळा सुरु करणारे व सावकारशाही व नोकरशाही विरोधात बंड करणारे जोतीबा एकमेव समाजसुधारक ठरले सनातन्यांनी त्यांना कडाडून विरोध केला असला तरी ज्योतिबा कधीच थांबले नाहीत त्यांनी शोषण, जाती निर्मूलन, स्त्रियांचे सक्षमीकरण, शिक्षण व विधवाविवाहांचे पुरजोर समर्थन केले व थोर समाजसुधारक व शिक्षणाचे जनक ठरले त्यांनी स्त्रियांना, अस्पृश्यांना, कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना सामाजिक प्रवाहात आणले व सामाजिक परिवर्तन घडवून आणले त्यासाठी त्यांना अनेक आंदोलने उभी करावी लागली कधी समाजाच्या परंपरेविरुद्ध तर कधी धर्म रूढी परंपरांच्या विपरीत कार्य करावे लागले तर कधी सरकारच्या विरोधात जाऊन आंदोलने करावी लागली त्यामुळेच त्यांना सत्यशोधक समाज या चळवळीची स्थापना करावी लागली आणी माञ महात्मा फुलेसह अनेक समाज सुधारकांनी ज्ञानी सामाजाचे स्वप्न या महाराष्ट्राच्या मातीत पाहिले व विचारांनी या मातीला सुपीक बनवले अशा थोर महापुरुषांच्या विचारांनी भारावलेली ही पुरोगामी महाराष्ट्राची माती अंगाखांद्यावर घेऊन मोठे झालो खरे पण पुरोगामी विचारसरणीला डोक्यावर घेऊ शकलो का? या सुपीक मातीत तसे पिके आली का? असा प्रश्न निर्माण होतो  आणी आजही इतिहास जोतींबाच्या विचारांची त्यांच्या चळवळींची आणि सत्यशोधक समाजाची ग्वाही देत आहेत तरी देखील आम्ही आजही पुरोगामित्वाच्या दिशेने वाटचाल सुद्धा करू शकलो नाहीत किंवा जातीविरहीत समाजरचना करु शकलो नाहीत ही फार मोठी शोकांतिका आहे असो जेव्हा समाजजीवनाचा तोल ढळतो तत्त्वांना ग्लानी येते नीतीचा विपर्यास होतो आणि माणसांचा पशू होतो तेंव्हा समाजाला सावरणारा कोणीतरी महात्मा प्रकट होतो  माञ हे सत्य असले तरी आज महात्मा आपल्यातच प्रकट करावा लागेल मग शांती प्रचारक बुध्द असतिल कि सम्राट अशोक असतील किंवा छञपती शिवाजी महाराज असतील आणि विद्रोह करावा लागेल क्रांतीची पाऊलवाट पुन्हा तुडवावी लागेल यात शंका नाही... सामाजिक गुलामगिरीचा अंधार सर्वत्र दाटला असताना ज्यांच्या पावलांनी "सार्वजनिक सत्यधर्माची पहाट " देशाच्या दारी आली ते परमपावन व्यक्तीमत्व 

" महात्मा ज्योतिबा फुले"...!! 

आज ११ एप्रिल त्यांच्या जयंतीदिनी त्यांना कोटी कोटी प्रणाम....!!!



                                              - अँड. पंकज गायकवाड


aaple kayde


👉VISIT NOW👈
 कायद्याच्या नवनवीन माहितीसाठी 
आमच्या साईटला भेट द्या

                                Jyotiba, mahatma, joyotibaphule, savitriphule, jyotiravphule, sppu,  11april , 28 november, ११एप्रिल, २८नोव्हेंबर , महात्मा , जोतीबा, फुले, ज्योतीबा फुले, साविञीबाई फुले, ज्योतीरावसाविञी, 


         







No comments

Powered by Blogger.