मनुस्मृतीच्या दहनानंतर


मनुस्मृतीच्या दहनानंतर

             मनुस्मृतीच्या दहनानंतर आज तुमची दशा भलेही चांगली असेल योग्य असेल परंतु तुमची दिशा माञ आजही चुकिची अयोग्य व दयनिय आहे म्हणुन बाबासाहेब आंबेडकर दिशा दाखवितांना सन 1953 मध्ये मराठवाड्यात झालेल्या जमिन सत्याग्रहाच्या भाषणात म्हणतात तुमच्याकडे जमिन नाही कारणं त्या दुसर्यानी बळकावलेल्या आहेत तुमच्याकडे नोकर्या नाहित कारणं त्यांच्यावर इतरांनी मक्तेदारी स्थापण केली आहे तरिही तुम्ही दैववादावर भरवसा ठेऊन मनुस्मृतीच्या जळालेल्या काळ्या पानाची पुनरावृत्ती घडवुन आणत आहात जर तुम्ही दैववाद, देवी , देवतांवर विश्वास दाखवला तर आज मनुस्मृती दहन करुन काय फायदा झाला असा विचार मनात थैमान घालुन आहे
           तुम्ही हजारो वर्ष  देवी देवतांवर भरवसा ठेवुन राहिलात म्हणुन जमिनी गेल्या नोकर्याही गेल्या आणी अपमान सहन करावा लागला तो वेगळाच आम्हाला हजारो वर्ष या देवांनी दर्शन दिले नाही व अक्षरक्षः मंदिरातही येऊ दिले नाही मग आज तुम्ही का सांगत नाहित कि आम्हाला तुमच्या मंदिरातचं यायचं नाहि बाबासाहेबांनी 25 डिसेंबर याच दिवशी का बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन केले कारण हा तोच दिवस ज्या दिवशी महाराष्ट्राचे आराध्य छञपती शिवाजी महाराजांना मनुस्मृती नुसार  शुद्र ठरवुन राज्यभिषेकाला नकार देण्यात आला आणी जो राज्यभिषेक गागाभटाने केला त्याच्याशी तुम्ही परिचीत आहातच मग स्वतः महाराजांना या मनुस्मृतीच्या विषाचे घोट घ्यावे लागले त्यात तुमचे आमचे काय आणी म्हणुन 25 डिसेंबर 1927 ला बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे रायगडाच्या पायथ्याशी दहन केले  अन् वर्णभेदाच्या भटबुध्दीला सुरुंग लावला. 
           जगातील महान बुध्दिमान ठरलेले बाबासाहेब सांगतात कि या देवि देवतांवर भरवसा ठेवु नका या दंत कथा आहेत मग आपणं आजही देवांवर भरवसा ठेवत आहोत आणी यामुळेच आपली दिशा अयोग्य आहे पण अजुन वेळ गेलेली मरगळ झटका 
 ऊठा या दैववादावर भरवसा ठेवु नका

तुमची ताकद उभी करा

शिका!
संघटित व्हा!!
संघर्ष करा!!!
             
                                  - अँड. पंकज गायकवाड

(संदर्भ "डाँ. आँबेडकरांनी मनुस्मृती का जाळली" विद्रोही कवी डाँ यशवंत मनोहर  - 2005)


Please Visit Now
 Legal Information 


No comments

Powered by Blogger.