ज्ञानी समाजाचे स्वप्न बाळगणारा एक अवलिया व पुरोगामित्वाचा महामेरू संत गाडगे बाबा


ज्ञानी समाजाचे स्वप्न बाळगणारा एक अवलिया व पुरोगामित्वाचा महामेरू 
संत गाडगे बाबा


           23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावतीच्या शेणगावात एक अवलिया जन्माला येतो आणि अवघ्या महाराष्ट्राला स्वच्छता, सामाजिक न्याय, शिक्षण आणि ज्ञानी समाजाचे स्वप्न ऊराशी बाळगुन अवघा महाराष्ट्राला पुरोगामित्वाचा धडा देणारा महामेरु म्हणजे संत गाडगेबाबा
            संत गाडगे बाबांनी आपल्या आयुष्यभर जनतेला स्वच्छतेचा संदेश दिला आणि शिक्षणाचे महत्त्व समजून सांगितले गाडगे बाबा नेहमी गावोगावी जाऊन तेथे स्वच्छता करणे व सायंकाळी किर्तनाचा कार्यक्रम घेत असे म्हणून बाबांना ज्ञानी समाजाचे स्वप्न बाळगणारा युगपुरुष म्हटले तरी वावगे ठरणार नाही स्वतःच्या कीर्तनातून समाज प्रबोधन घडवून आणणे व ज्ञानी समाज घडवणे व समाजाची सामाजिक प्रगती घडवून आणणे समता निर्माण करण्यासाठी रात्रंदिवस झटत राहणारे पुरोगामी व्यक्तिमत्व म्हणजेच गाडगे बाबा 
           मला आज न राहून सांगावेसे वाटते की डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगे बाबा यांच्यात एक अतूट नाते होते मला एक प्रसंगही आवर्जून सांगावासा वाटतोय की डाँ. बाबासाहेब आंबेडकरांची एकेठिकाणी सभा सुरू होती आणि अचानक पणे गाडगे बाबा तिथे पोहोचले बाबांना पाहून डॉ. आंबेडकरांना आचर्य वाटले गाडगे बाबा दोन्ही हातात फुलांची माळ घेऊन उभे ठाकले होते ते पाहूनच आंबेडकरांनी बाबांना स्टेजवर येण्याची विनंती केली परंतु संत गाडगेबाबांनी "बाबासाहेब तुम्हीच खाली यावे व या अडाण्याचा पुष्पहार स्विकारावा" अशी विनंती केली परंतु डाँ.आंबेडकरांनी बाबांना सांगितले जर तुम्ही स्टेजवर आलात तरच मी तुमचा पुष्पहार स्वीकारेल नाहीतर मी पुष्पहार स्वीकारणार नाही तरीही बाबांनी डाँ. आंबेडकर यांनाच तुम्ही खाली यावे अशी विनंती केली असे डाँ बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगे बाबा यांच्यात बराच वेळ या दोन्ही महापुरुषांनी एकमेकांना बोलावण्यासाठीची विनंती करत होते मग वेळ वाढत होती म्हणून डाँ. बाबासाहेब आंबेडकर  गाडगे बाबांना रागात विचारतात "बाबा तुम्ही स्टेजवर का येत नाहीत"
 मात्र बाबांनी अतिशय शांत आणि नम्रपणे उत्तर दिले की "बाबासाहेब तुम्ही ज्या स्टेजवर उभे आहात त्या स्टेजला पाय लावायची माझी तरी लायकी नाही"
 हे बोल ऐकताच क्षणी बाबासाहेब स्टेजवरून खाली आले आणि या महान संतांची पुष्पमाला स्वीकारली. व गाडगेबाबांना मिठी मारली 
 "आता तुमचे चालू द्या"
 असे बोलून संत गाडगेबाबा क्षणात तेथून निघून गेले व  पुढच्या भाषणासाठी बाबासाहेब स्टेजच्या दिशेने वळाले आणि बघतात तर काय सगळा मंच रिकामा झाला होता  स्टेजवरील सगळ्या खुर्च्या रिकाम्या झाल्या होत्या सर्व नेत्यांनी प्रेक्षकांत बसणे पसंत केले होते आणि बाबासाहेब स्टेजवरून सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत होते तेव्हापासून गाडगे बाबांचे जिथे जिथे किर्तन असायचे तिथे डाँ बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर प्रेक्षकांत बसायचे गाडगेबाबांचे कीर्तन जेथे कुठेही सुरू असले  तेथे जाऊन डाँ बाबासाहेब  कधीही मंचावर बसलेले नाहीत.
हि या दोन्ही महापुरुषांनी एकमेकांच्या कर्तुत्वाचा केलेला आदर म्हणता येईल



                 गाडगे महाराज नेहमीच देवधर्म आदी गोष्टींवर घाणाघाती टीका करायचे देव हे ब्राम्हणांची रोजगार हमी योजना असेही अनेक वेळा बाबांनी संबोधले होते कर्ज काढून देवी-देवतांचे कार्यक्रम करू नयेत आणि मुक्या प्राण्यांची हत्या करू नये  यासाठी नेहमीच संत गाडगेबाबा जनमानसात प्रबोधन घडवून आणणे चे काम करत असत गाडगे बाबा 30 वर्ष आषाढी कार्तीकी ला पंढरपूरला गेले  मात्र कधीही विठ्ठल मंदिरात प्रवेशही केला नाही चंद्रभागेचा किनारा स्वच्छ करुन राञी येण्यार्या लोकांचे किर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करायचे आणी बाबा लोकांना विचारायचे 
तुमचा देव कोठे राहतो तर लोक सांगायचे आमचा देव देवळात राहतो तेव्हा गाडगे बाबा म्हणायचे माझा देव माझ्या मनात राहतो 
पुन्हा बाबा विचारत तुमचा देव आंघोळ करतो का लोक बोलायचे हो आमचा देव आंघोळ करतो बाबा विचारायचे कोण घालते तुमच्या देवाला आंघोळ लोक बोलायचे आम्हीच घालतो की 
पुन्हा बाबा विचारायचे तुमचा देव धोतर नेसतो की नाही लोक बोलायचे हो नेसतो तर बाबा  विचारत कोण नेसवतं आम्हीच नसतो की, 
मग पुन्हा बाबा विचारायचे तुमच्या देवाला नैवेद्य  देता की नाही तेव्हा लोक बोलायचे हो देतो की मग बाबा बोलत नैवद्य दिल्यावर काय करता 
तर बाजूला काठी घेऊन बसतो का? तर कावळा कुत्रा नैवेद्य खाऊ नये म्हणून 
मग बाबा बोलायचे अरे तुमचा देव स्वतः अंघोळ करू शकत नाही 
स्वतःचे धोतर नेसू शकत नाही किंवा दिलेल्या नैवेद्याचे रक्षण करू शकत नाही असा देव  तुमचे रक्षण ते काय करणार आणि मग

              गाडगे बाबा सांगत अरे देव बघायचा का देव तर मग बाबा बाजूला उभा असलेला मानुस रापलेला चेहरा, जाड्या भरड्या खादिचे कपडे, पांढरीशुभ्र दाढी, अनवानी पाय असलेल्या माणसाकडे बोट दाखवून म्हणायचे देव म्हणायचं असेल तर या भाऊराव पाटलाला म्हणा कारण तो गरिबांच्या मुलांना शिकवण्याचं काम करतो आहे  दान करायचे असेल तर त्याला करा कारण तो ज्ञानदानाचे पविञ काम करत आहे असो
 असे म्हणतात साधु संत येती घरा तोची दिवाळी दसरा माञ संत गाडगेबाबा या महाराष्ट्रात जन्माला आले हे महाराष्ट्राची दिवाळीच समजावे लागेल संतशिरोमनी गाडगेबाबा नेहमीच जनकल्याणाचा, सामाजिक न्यायाचा, स्वच्छतेचा, जाती निर्मूलनाचा, आणि पुरोगामित्वाचा संदेश लोकांना देत लोकांत जनजागृती घडवून आणत अशा या महान महापुरुषास त्यांच्या  जयंती दिनांनिमीत्त माझे विनम्र अभिवादन 

                                    - अँड. पंकज गायकवाड 



        





No comments

Powered by Blogger.